महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JK : चकमकीत दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिह्यातील मालबाग परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. गुरूवारी रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याच्या खात्मा केला. एका जवानाला या चकमकीत वीरमरण आले.

Terrorist killed in encounter with security forces in Srinagar's Malbagh, CRPF jawan martyred
JK : चकमकीत दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण

By

Published : Jul 3, 2020, 12:57 AM IST

Updated : Jul 3, 2020, 4:38 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिह्यातील मालबाग परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. गुरूवारी रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याच्या खात्मा केला. एका जवानाला या चकमकीत वीरमरण आले.

'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सीआरपीएफच्या जवानांना हजरतबल दर्गाहच्या मालबाग परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा जवानांनी मालबाग परिसरात शोधमोहिम सुरू होती. या दरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. ही चकमक उशिरा रात्री चालली. यात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. पण, या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.

जम्मू-काश्मीरचे पोलीस डीजी दिलबाग सिंह यांनी चकमक झाल्याचे सांगितले. तर जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी क्विक अॅक्शन टीमच्या एक जवानाला वीरमरण आल्याचे स्पष्ट केले.

जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक....

चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याआधी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी याच परिसरात शोधमोहिम केली होती. यावेळी जवानांवर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. तेव्हा भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्त्युत्तर दिले होते. दरम्यान, जून महिन्यात जवानांनी जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या परिसरात 16 मोहिम केल्या. यात त्यांनी 51 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

हेही वाचा -भारत रशियातील सामरिक भागीदारी मजबूत करण्यावर मोदी-पुतिन यांचे मतैक्य

हेही वाचा -निमलष्करी दलात तृतीयपंथीयांच्या भरतीबाबत गृहमंत्रालयाने मागितल्या सूचना

Last Updated : Jul 3, 2020, 4:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details