श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. शहराच्या चरार-ए-शरीफ या भागात सोमवारी सकाळीपासून चकमक सुरू होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे, एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
आजच्या चकमकीबाबत ट्विट करत काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी सकाळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अद्यापही चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.