श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांचे लपण्याचे अड्डे सैन्य दलाकडून उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर व जम्मू-काश्मीर पोलिसांकडून संयुक्त शोध मोहिम राबवण्यात आली होती. पूंछ जिल्ह्यातील मंगनार शिखरावर दहशतवाद्याच्या लपण्याचे अड्डे होते. या ठिकाणावरून दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.
गुप्तचरांकडून आम्हाला दहशतवाद्यांचे लपण्याच्या अड्ड्याविषयी माहिती मिळाली होती. त्या आधारावर, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) पूंछ आणि स्थानिक सैन्याच्या युनिटने शोधमोहीम सुरू केली. यावेळी मंगनारमधील कालसा वनक्षेत्रात एक संशयित जागा दिसली. त्या ठिकाणाची झडती घेतली असता, दोन एके-47 रायफल आणि चार मॅग्जीन आढळले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) रमेश अंगरल यांनी दिली.