श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात आज (मंगळावार) केंद्रीय राखीव दलाच्या गस्त पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात सीआरपीएफ दलाचा एक जवान शहीद झाला आहे. जवानांचे एक पथक गस्तीवर असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर गोळीबार; एक जवान हुतात्मा - सीआरपीएफच्या गस्त पथक
अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुदीप चौधरी यांनी हल्ल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी गोळीबारासह ग्रेनेड हल्लाही केला.
Breaking News
अनंतनाग जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुदीप चौधरी यांनी हल्ल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी गोळीबारासह ग्रेनेड हल्लाही केला. काश्मीर खोऱ्यात पोलीस आणि लष्कर मिळून दहशतवाद्यांविरोधात संयुक्त अभियान राबवत आहे. सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले , तर 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.