श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील हंदवाडा भागामध्ये दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवानांना वीरमरण आले. तर ७ जवान जखमी झाले. यावेळी एका दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला आहे.
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवानांना वीरमरण, ७ जखमी - काश्मीर चकमक बातमी
सीआरपीएफ गस्त पथकावर काझीयाबाद परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
![काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवानांना वीरमरण, ७ जखमी terrorist attack in Handwara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7059917-475-7059917-1588600503993.jpg)
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवानांना वीरमरण
सीआरपीएफ गस्त पथकावर काझीयाबाद परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला. अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षा दलांनी परिसर सील केला असून सर्च ऑपरेश राबविण्यात येत आहे. सीआरपीएफचे श्रीनगरमधील प्रवक्ते पंकज सिंह यांनी ईटीव्ही भारताला माहिती दिली.
काल(रविवारी) हंदवाडा भागामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवानांना वीरमरण आले होते. कर्नल, मेजरसह पाच जवान चकमकीत हुतात्मा झाले. आज पुन्हा दहशतवाद्यांनी जवानांच्या गस्त पथकावर हल्ला केला.
Last Updated : May 4, 2020, 7:52 PM IST