महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सुरक्षा दलाला दुसऱ्या दिवशीही यश; शोपियान जिल्ह्यातून दहशतवाद्याला अटक - LeT commander Sajjad Hyder

अटकेतील दहशतवाद्याची पोलिसांनी अद्याप ओळख जाहीर केली नाही. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

संग्रहित- सीमेवर तैनात जवान
संग्रहित- सीमेवर तैनात जवान

By

Published : Aug 18, 2020, 12:10 PM IST

श्रीनगर – सुरक्षा दलाने सोमवारी तीन दहशतवाद्यांना सोमवारी ठार केल्यानंतर आजही यश मिळविले आहे. नव्याने दहशतवादी कारवायात सहभागी झालेल्या दहशतावाद्याला सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई शोपियान जिल्ह्यातील मालदरा भागात केल्याचे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी माहिती दिली.

अटकेतील दहशतवाद्याची पोलिसांनी अद्याप ओळख जाहीर केली नाही. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साज्जद हैदर उर्फ राजा याला सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी सोमवारी ठार केले. ही कारवाई बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी तालुक्यातील टिंडडिम गावात करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी सुरक्षा दलाने आणखी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

ABOUT THE AUTHOR

...view details