महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्याच्या ५ हस्तकांना अटक - jammu kashmir terrorist

दहशतवाद्यांना निवार देणे, साधनसामुग्री पुरवण्यामध्ये या पाच जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे भविष्यात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कटही उधळण्यात आला आहे.

file photo
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 12, 2020, 8:25 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलिसांनी बडगाम जिल्ह्यातून दहशतवाद्यांच्या ५ हस्तकांना अटक केली आहे. 'इस्लामिक स्टेट इन जम्मू अ‌ॅड काश्मीर' या संघटनेच्या सदस्यांना हे हस्तक मदत करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दहशतवाद्यांना निवार देणे, साधनसामुग्री पुरवण्यामध्ये या पाच जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितेले. या कारवाईमुळे भविष्यात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कटही उधळण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीला जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या तीन हस्तकांना पोलिसांनी अटक केली होती. श्रीनगर मधील लाल चौकात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात या तिघांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details