महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गाझियाबादमधून 10 इंडोनेशियन नागरिक पोलिसांच्या ताब्यात - ten indonesian find out in ghaziabad

गाझियाबाद शहराच्या शहीद नगर भागात शनिवारी (दि. 4 एप्रिल) इंडोनेशियाच्या 10 नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नागरिकांशी संवाद साधताना पोलीस अधिकारी
नागरिकांशी संवाद साधताना पोलीस अधिकारी

By

Published : Apr 5, 2020, 5:53 PM IST

लखनऊ- गाझियाबाद शहराच्या शहीद नगर भागात शनिवारी (दि. 4 एप्रिल) इंडोनेशियाच्या 10 नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले की, या नागरिकांशी संपर्क आलेल्यांनी पोलिसांना माहिती द्यावी.

रात्रभर झाली छापेमारी

शहीद नगर भागात पोलिसांनी रात्रभर अनेक ठिकाणी छापेमारी केली. इंडोनेशियन नागरिकांसह 15 जणांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला अशून त्यांची चौकशी सुरु आहे.

दोन दिवसांपूर्वी पसोंडातून एका नेपाळी नागरिकाला घेतले होते ताब्यात

शहीद नगरपासून जवळच असलेल्या वजीराबाद रोड जपळील पसोंडा भागातून दोन दिवसांपूर्वी नेपाळी नागरिकांना पकडण्यात आले होते. तेही ओळख लपवून रहात असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे आणखी नागरिक लपून असल्याची पोलिसांना शंका आहे.

हेही वाचा -कोरोनाशी दोन हात : कोरोनावर मात करून 'ती' पुन्हा रूग्णसेवेत!

ABOUT THE AUTHOR

...view details