महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानातील 'त्रिनेत्र गणेश' जो भक्तांच्या चिठ्ठ्यांमधून मनोकामना करतो पूर्ण.. - भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिर

मंदिरात विराजमान गणेशाला तीन डोळे आहेत, यामुळे या गणेशाला 'त्रिनेत्र गणेश' असे म्हणतात. मंदिरात गणपतीसह त्याच्या दोन्ही पत्नी रिद्धी-सिद्धी आणि दोन्ही मुले शुभ आणि लाभ विराजमान आहेत.

त्रिनेत्र गणेश
त्रिनेत्र गणेश

By

Published : Aug 26, 2020, 7:07 AM IST

सवाई माधोपूर( राजस्थान ) - जिल्ह्यातील रणथंभौर किल्यावर त्रिनेत्र गणेशाचे मंदिर आहे. देश विदेशातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. मंदिरासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या अनेक कथा या मंदिराला विशेष बनवतात. यामुळेच भाविकांची याठिकाणी मोठी गर्दी असते. येथील स्थायी लोक कोणत्याही शुभ कार्या आधी बाप्पांना निमंत्रण पाठवतात. मनोकामना पुर्ण करणाऱ्या 'त्रिनेत्र गणेश'चा संदर्भातील ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट.

शहरापासून १५ किलोमीटर दूर जंगलात रणथंभौर किल्ला आहे. या किल्लावरच त्रिनेत्र गणेशाचे मंदिर आहे. मंदिरात विराजमान गणेशाला तीन डोळे आहेत, यामुळे या गणेशाला 'त्रिनेत्र गणेश' असे म्हणतात. मंदिरात गणपतीसह त्याच्या दोन्ही पत्नी रिद्धी-सिद्धी आणि दोन्ही मुले शुभ आणि लाभ विराजमान आहेत. गणेश चतुर्थीच्या काळात मंदिरावर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात. सोबतच दरवर्षी भाद्रपद महिन्यात येथे मोठी जत्रा भरते. यावेळी येथे देश-विदेशातील लाखो भाविक येत असतात.

त्रिनेत्र गणेशाविषयी ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

१० व्या शतकात निर्माण झालेल्या या मंदिराची निर्मीती महाराजा हमीरसिंह यांनी केली होती. मुळात यामागचा इतिहास देखील फार रंजक आहे. दिल्लीचा बादशहा अलाउद्दीन खिलजी आणि महाराजा हमीरसिंह यांच्यात युद्ध सुरू होत. खिलजीच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिलेला होता. अशावेळी गणेशाने महाराजा स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले तू माझी पुजा कर म्हणजे तुझे सर्व दु:ख दूर होतील. दुसऱ्याच दिवशी किल्ल्याच्या भिंतीवर गणेशाचे दर्शन व्हायला लागले. याच ठिकाणी महाराजाने गणेशाचे भव्य मंदिर बांधले.

हेही वाचा -आंध्रप्रदेशातील 'या' गणेश मंदिरात दररोज वाढत आहे मूर्तीचा आकार

मंदिराविषयीच्या दंतकथा -

1) द्वापार युगात कृष्ण आणि रुख्यमीणीच्या लग्नावेळी कृष्णाने चुकून गणपतीला निमंत्रण दिले नाही. म्हणून नाराज झालेल्या गणपतीने रागात कृष्णाचा मार्ग अडवला. यानंतर कृष्णाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. यानंतर प्रत्येत मंगल कार्यात गणेशाला आधी निमंत्रण देण्याची प्रथा सुरू झाली होती.

2) एका मान्यतेनुसार त्रेता युगात लंकेकडे मार्गस्थ होण्यापुर्वी प्रभू श्रीरामाने याच गणेशाचे पूजन केले होते. यावेळी त्रिनेत्र स्वयूंभ गणपती प्रकट झाला आणि नंतर लुप्त झाला.

3) एका मान्यतेनुसार हे मंदिर पांडवांच्या काळातील असल्याचेही सांगितले जाते. कृष्णाचे लग्न झाले पण माझे लग्न झाले नाही यावरून गणेश नाराज झाले होते. यावेळी रणथंभौरच्याच रिद्धी आणि सिध्दी सोबत गणेशाचे लग्न करण्यात आले. यावेळी पासूनच रिद्धी आणि सिद्धीसोबत येथे निवास करतात.

हेही वाचा -कर्नाटक : जाणून घ्या हम्पीमधील गणेश मंदिरांचा इतिहास आणि महत्व...

ABOUT THE AUTHOR

...view details