सिद्दीपेट- तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांचे मुळ गाव असलेल्या चिंतमादाका या गावात राहणाऱ्या २००० कुटुंबांनाच राज्य सरकार १० लाख रुपये देणार आहे.
मोदी नव्हे तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री प्रत्येक कुटंबाला देणार १० लाख रुपये - सिद्दीपेट
या गावातील नागरिकांसाठी माझी काही कर्तव्य आहेत. राज्य सरकार चिंतमादाका गावात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला १० लाखाची मदत करणार आहे.
चिंतमादाका या मुळ गावी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. चंद्रशेखर राव म्हणाले, मी चिंतमादाका या गावात जन्म घेतला आहे. या गावातील नागरिकांसाठी माझी काही कर्तव्य आहेत. आज मी जाहीर करतो, की राज्य सरकार चिंतमादाका गावात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला १० लाखाची मदत करणार आहे. या १० लाख रुपयांच्या मदतीने नागरिक त्यांना हव्या त्या वस्तू विकत घेऊ शकतात.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गावकरी या पैशातून ट्रॅक्टर, शेती आणि शेतीसाठी उपयुक्त मशिन खरेदी करू शकतात. गावात असणाऱ्या २ हजार कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. यासाठी जवळपास २ हजार कोटींचा निधी लागणार आहे. परंतु, हा निधी मी त्वरित मंजुर करणार आहे.