महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सिद्दीपेट महापालिकेने ४० भटक्या कुत्र्यांना केले ठार; पुरलेले मृतदेह पोलिसांनी घेतले ताब्यात, ४ अधिकारी निलंबित

सिद्दीपेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणि त्यानंतर न्यायवैद्यकशास्त्र तपासणी प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक सायन्स लॅब) पाठवण्यात आले आहेत. तसेच, याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ आणि सेक्शन ११ नुसार प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेने भटके कुत्रे केले ठार

By

Published : Jun 23, 2019, 7:34 PM IST

Updated : Jun 23, 2019, 10:07 PM IST

सिद्दीपेट - प्राण्यांविरोधात क्रूर आणि हिंसक कृत्य केल्याची घटना तेलंगणातील सिद्दीपेट येथे घडली आहे. येथे जवळपास ४० भटक्या कुत्र्यांना महापालिकेच्या कामगारांनी ठार केल्याचे समोर आले आहे. १९ जूनला ही घटना घडली. याविरोधात तक्रार दाखल झाली असून विकाराबाद पोलिसांनी सर्व कुत्र्यांचे पुरलेले मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच, ४ संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

सिद्दीपेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणि त्यानंतर न्यायवैद्यकशास्त्र तपासणी प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक सायन्स लॅब) पाठवण्यात आले आहेत. तसेच, याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ आणि सेक्शन ११ नुसार प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य नावाच्या व्यक्तीकडून पोलिसांना या प्रकरणाविषयी माहिती मिळाली होती. अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Jun 23, 2019, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details