हैदराबाद - दिल्लीतील दक्षिण भागात एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे खबरदारी बाळगत तेलंगाणा सरकारने खाद्यपदार्थांची ऑनलाईन डिलेव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटोवर बंदी आणली आहे. कोरोनाच्या संकटात ऑनलाईन अन्न मागवणे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.
कोरोना भीतीपोटी तेलंगाणा सरकारने स्विगी, झोमाटोवर घातली बंदी - COVID 19
तेलंगाणा सरकारने खाद्यपदार्थांची ऑनलाईन डिलेव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटोवर बंदी आणली आहे.
तेलंगाणा सरकारने रविवारी स्विगी व झोमॅटो यांना खाद्यपदार्थांची ऑनलाइन डिलेव्हरी बंद करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लोकांनी बाहेरून खाद्य मागवण्याऐवजी घरीच पदार्थ तयार करावे. विशेषत: सध्याच्या लॉकडाऊन कालावधीत ते करणे गरजेचे आहे. स्विगी व झोमॅटो बंद करण्याच्या निर्णयावर आम्हीही आनंदी नाही. त्यांच्याकडून सरकारला कराच्या माध्यमातून महसूल मिळतो. मात्र, सार्वजनिक आरोग्यापेक्षा महसुल महत्त्वाचा नाही, असे ते म्हणाले.