महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' काँग्रेस महिला आमदाराने २० किमी पायी डोंगर-दऱ्या पार करत आदिवासींना पुरविले अन्न - सीताक्का तेलंगाणा काँग्रेस आमदार

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात वाझिडू मंडळ येथील गुडेम गावातील आदिवासींना खायला अन्न देखील नव्हते. ही बाब पूर्वी माओवादी आणि आता काँग्रेस आमदार असलेल्या सीताक्का यांना समजताच त्यांनी पायी प्रवास करत या आदिवासींची मदत केली.

Dasari Anasuya  Seethakka  Congress MLA  Maoist  Mulugu  Telangana  Essentials  Lockdown  Tribals  COVID 19  Novel Coronavirus  सीताक्का तेलंगाणा काँग्रेस आमदार  देनसारी अनासुया काँग्रेस आमदार तेलंगाणा
'या' काँग्रेस आमदाराने २० किमी पायी डोंगर-दऱ्या पार करत आदिवासींना दिले अन्न

By

Published : May 4, 2020, 11:14 AM IST

Updated : May 4, 2020, 1:37 PM IST

हैदराबाद - लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तेलंगाणातील काँग्रेस महिला आमदाराने डोंगर-दऱ्या पार करून पायी प्रवास करत आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. देनसारी अनासुया, असे या आमदार महिलेचे नाव असून त्या यापूर्वी माओवादी होत्या.

'या' काँग्रेस महिला आमदाराने २० किमी पायी डोंगर-दऱ्या पार करत आदिवासींना पुरविले अन्न

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात वाझिडू मंडळ येथील गुडेम गावातील आदिवासींना खायला अन्न देखील नाही, हे अनासुया यांना समजले. त्यानंतर त्या रविवारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नल्लेला कुमारस्वामी आणि उपनिबंधक तस्लीमा यांच्यासोबत २० किलोमीटर पायी प्रवास करत पेन्नूगोलू गुडेम गावात पोहोचले. त्याठिकाणी राहणाऱ्या १५ आदिवासी कुटुंबीयांना तांदूळ, भाजीपाला यांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्या यापूर्वी माओवादी असल्याने त्यांना जंगलातील रस्ते, डोंगर-दऱ्या माहिती होत्या. त्यामुळे त्यांना गावात पोहोचण्यास अडचण गेली नाही.

कोण आहेत अनासुया? -

अनासुया यांना सिताक्का म्हणून ओळखले जाते. त्या पूर्वी माओवादी होत्या. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर वांरगल न्यायालयात वकीलीचा सराव देखील केला. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी मुलुगू येथून विधानसभेची निवडूक लढवली आणि त्या निवडून देखील आल्या.

Last Updated : May 4, 2020, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details