महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगणा: पेटवून दिलेल्या 'त्या' तहसिलदार महिलेला वाचवण्यास गेलेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू - telangana latest news

महिला तहसिलदारास वाचवण्यास गेलेल्या ड्रायव्हरचाही आज(मंगळवारी) मृत्यू झाला आहे. गंभीर भाजल्यामुळे अत्यवस्थ स्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज मृत्यू झाला.

गुरुनाथम

By

Published : Nov 5, 2019, 3:09 PM IST

हैदराबाद- तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना काल घडली. अब्दुल्लापुरमेट तालुक्याच्या तहसिलदार विजया रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळण्यात आले होते. त्यावेळी त्यांना वाचवण्यास गेलेल्या ड्रायव्हरचाही आज (मंगळवारी) मृत्यू झाला आहे. गुरुनाथम असे मृत्यू झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. आग विझवताना तो गंभीररीत्या भाजला होता.

काल एका व्यक्तीने तहसिलदार कार्यालयात घुसून विजया यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले, त्यानंतर हल्लेखोराने स्वतःलाही पेटवून घेतले होते. या घटनेत विजया यांचा मृत्यू झाला, तर हल्लेखोराची प्रकृती गंभीर आहे. विजया यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तहसिलदार कार्यालयातील दोन कर्मचारीही जखमी झाले होते. त्यातील एकाचा आज मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वेगाने पसरत आहे. तसेच, तहसिलदारांना का पेटवून दिले? याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्कही लावले जात आहेत. हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details