हैदराबाद -तेलंगाणा राज्यात जोरदार पाऊस पडला असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्य सरकारने सर्व खासगी संस्था / कार्यालये / आवश्यक नसलेल्या सेवांसाठी बुधवार आणि गुरवार दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तेलंगणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
तेलंगाणात मुसळधार पावसाचा इशारा, हैदराबादसह संपूर्ण राज्यात सतर्कतेचे आदेश - तेलंगणा
राज्यात मुसळधार पाऊस होत असून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सुंपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला असून उच्च अधिकाऱ्यांसह संपूर्ण जिल्हा प्रशासनला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात मुसळधार पाऊस होत असून अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सुंपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला असून उच्च अधिकाऱ्यांसह संपूर्ण जिल्हा प्रशासनला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असा अधिकृत संदेश तेलंगाणाचे मुख्य सचिव सोमेश यांनी दिला आहे.
झाडे आणि विद्युत खांब कोसळल्यामुळे सामान्य क्रिया विस्कळीत झाल्या असून जलाशय ओसंडून वाहत आहेत. याचबरोबर सखल भाग जलमय झाले आहेत. विविध घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर येत्या काही तासात आणखी पावसाचा इशारा दिल्याने परिस्थीती बिकट होण्याची शक्यता आहे.