हैदराबाद -हवालदार आणि पीडित यांच्यात वाद झाला आणि त्यामुळे ही घटना घडली. आम्ही कारवाई करुन कॉन्स्टेबल अशोकला निलंबित केले."ही घटना गुरुवारी घडली, अशी माहिती वनापर्थी पोलिस अधीक्षक (एसपी) अपूर्व राव यांनी दिली. घटनाक्रम असा की हैदराबादचा रहिवासी असलेला मुरली कृष्णा आपल्या मुलासह दुचाकीवरून प्रवास करीत होता. पोलिसांनी त्याला अडवून लॉकडाऊन असूनही बाहेर पडल्याबद्दल चौकशी केली. मुरली कृष्णा म्हणाले, लॉकडाऊनचा काळ असल्याने सामान आणण्यासाठी काल संध्याकाळी माझ्या मुलासमवेत बाहेर गेलो. आम्ही बसस्थानकाजवळ पोहोचलो, त्यावेळी काही पोलिसांनी मला थांबवले आणि चौकशी केली. मी ताबडतोब माफी मागितली आणि असे पुन्हा करणार नाही, याची ग्वाही दिली.
तेलंगाणात एकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार निलंबित - तेलंगाणा पोलिसांची मारहाण
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीयो मंत्री के.टी. रामाराव यांनी बघितला आणि या हवालदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याठिकाणी अजून एक पोलीस हवालदार होता, तो चिडून माझ्याकडे आला आणि माझ्या दुचाकीची चावी घेऊन गेला. मी अनेक दिवसाचे दंड भरले नसल्याचे त्यांनी मला सांगितले. मी गेल्या खूप दिवसांपासून दुचाकी वापरत नव्हतो, येत्या काहीच दिवसात मी सगळे पैसे भरेल, आता मला जाऊ द्या, अशी विनंती मी त्याला केली. हवालदारने त्याला ढकलून खाली पाडले आणि लाथा मारल्याचा आरोप कृष्णाने केला आहे. माझ्या लहानशा मुलानेही मला न मारण्यासाठी त्यांना विनंती केली. मात्र, त्या चारही हवालदारांनी मिळून मला मारहाण केली. मला जबरदस्ती गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले आणि माझ्याविरोधात व्हिडीओ तयार केला. ठाण्यातील दुसऱ्या हवालदारला मी त्यांना मारहाण केल्याचे सांगितले. मला एका खोलीत नेऊन त्या पाचही हवालदारांनी मारहाण केली, असे कृष्णाने सांगितले. तर, मी आणि माझे वडील दुध आणायला बाहेर पडलो होतो. चेकपॉइंटजवळ या हवालदारांनी रोकून माझ्या वडीलांना मारहाण केली, असे कृष्णाच्या मुलाने सांगितले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीयो मंत्री के.टी. रामाराव यांनी बघितला आणि या हवालदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मंत्री के.टी. रामाराव यांनी तेलंगाणाचे पोलीस महासंचालकांना ट्विट केले. पोलिसांची ही वर्तणूक कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची विनंती. सगळीकडे पोलीस खूप चांगले काम करत आहेत. मात्र, अशा काही लोकांमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, असेही त्यांनी नमूद केले.