रंगा रेड्डी (तेलंगाणा)- तेलंगाणाचे भाजप अध्यक्ष बांदी संजय कुमार यांनी आज सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. बांदी कुमार हे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्यातील कोहेडा गावातील एका फळबाजारात गेले होते. या फळ बाजाराला मुसळधार पावसामुळे नुकसान झाले होते. यावेळी फळ बाजाराचा आढावा घेताना सदर प्रकार घडला.
एका व्हिडिओमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. त्यात बांदी कुमार आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसून येत आहे. या ठिकाणी पोलीसही होते, मात्र त्यांनी देखील सोशल डिस्टन्सिंगला बगल दिल्याचे दिसून आले आहे.