हैदराबाद -तेलंगाणामधील भाजपचे आमदार राजा सिंग यांनी रविवारी रात्री कोरोनाविरोधात घोषणाबाजी केली. लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्याबर बसवून कार्यकर्ते जमा करत 'चिनी विषाणू परत जा', अशी घोषणाबाजी केली.
'चिनी विषाणू परत जा', लॉकडाऊनचे नियम धाब्याबर बसवून भाजप आमदाराची घोषणाबाजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तेलंगाणमधील भाजपचे आमदार राजा सिंग यांनी रविवारी रात्री कोरोना विषाणूविरोधात घोषणाबाजी केली.
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकत्र येत रविवारी रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार राजासिंग यांनी टार्च आणि मशाल पेटवल्या. आपल्या कार्यकर्त्यासह एकत्र येत चिनी विषाणू परत जा, अशी घोषणाबाजी केली. राजा सिंग हे हैदराबादमधील गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे वादग्रस्त आमदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी एका व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशाला 5 एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे पेटवा आणि कोरोनाविरोधात देशाची असलेली एकजूट दाखवा असे आवाहन केलं होतं. या आवाहनाला अवघ्या देशाने सकारात्मक प्रतिसाद दिला. देशातल्या बहुतांश नागरिकांनी आपल्या घरात राहून दिवा लावला आणि कोरोना विरोधातली एकजूट दाखवून दिली.