हैदराबाद - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने देशाच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या आर्थिक घडामोडींमुळे सर्व राज्यांच्या विविध प्रदेशांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तेलंगाणामध्ये तांदळाचे भरघोस उत्पादन होत आहे. सिंचन सुविधांच्या सुधारानंतर राज्यात तांदळाच्या उत्पादनात विक्रमी स्तराची नोंद होत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
'तांदळाचे सर्वांत जास्त उत्पादन करणारे राज्य ठरणार तेलंगाणा' - तेलंगाणा
तेलंगाणामध्ये तांदळाचे भरघोस उत्पादन होत आहे. सिंचन सुविधांच्या सुधारानंतर राज्यात तांदळाच्या उत्पादनात विक्रमी स्तराची नोंद होत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
प्रमुख सिंचन प्रकल्प अधिक चांगल्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. याशिवाय 24 तासाचा वीजपुरवठा दिला जात आहे. यामुळे तेलंगाणा सर्वांत जास्त तांदळाचे उत्पादन केले जाणारे राज्य म्हणून उदयास येणार आहे, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती, असे राव म्हणाले.
पीक व लागवडीमध्ये वाढ होत असल्याने शेतीमालाला वाजवी आधार भाव मिळण्यासाठी व्यापक रणनीती आखली जात आहे. 40 लाख टन क्षमतेची अतिरिक्त गोदामे बांधण्याचे आणि 2 हजार 500 शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. तेलंगाणामधील लोकांचे जीवन शेतीशी निगडित आहे. 60 ते 65 लाख शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत, असे राव कृषी आणि नागरी पुरवठा मंत्री आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले.