पाटणा - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. हेडलाईनचे व्यवस्थापन करण्याऐवजी नितीश कुमार यांनी कोरोनाचे व्यवस्थापन करावे, असा टोला तेजस्वी यादव यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
'हेडलाईन व्यवस्थापन करण्याऐवजी कोरोनाचे व्यवस्थापन करावे'
दोन इंजिन असलेले सरकार हे लोकांचा छळ करत आहे. बिहार सरकार केवळ सत्तेची भूक भागविण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याची टीकाही यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे.
आरोग्याच्या पायाभूत क्षेत्रातील सुधारणांबाबत मुख्यमंत्री का गप्प आहेत? व्हेंटिलेटर, अतिदक्षतामधील खाटा आणि चाचणी केंद्राची संख्या वाढविण्याबाबत आम्ही सतत विचारत आहोत. मात्र, तुम्ही कोणतेही उत्तर तुम्ही दिले नाही. हे तुमचे अपयश नाही का? मुख्य शीर्षकाचे (हेडलाईन) व्यवस्थापन थांबवून कोरोनाचे व्यवस्थापन करावे, असे तेजस्वी यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रम घेतला. त्याचा निषेध म्हणून राष्ट्रीय जनता दलाने रविवारी 'गरीब अधिकार दिवस' पाळला आहे. दोन इंजिन असलेले सरकार हे लोकांचा छळ करत आहे. बिहार सरकार केवळ सत्तेची भूक भागविण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याची टीकाही यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केली आहे.