महाराष्ट्र

maharashtra

बिहार विधानसभा निवडणूक; दुसरा टप्पा अत्यंत चुरशीचा; तेजस्वी यादव यांच्यासह चार मंत्र्यांचे भवितव्य पणाला

By

Published : Nov 2, 2020, 12:51 PM IST

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ४१ हजार ३६२ मतदान केंद्र आहेत. बिहार विधानसभा निवडणूक एकूण तीन टप्प्यात होणार आहे.

तेजस्वी यादव
तेजस्वी यादव

पाटना- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा अत्यंत चुरशीचा ठरणार आहे. यामध्ये सुमारे १,५०० उमेदवारांचे भवितव्य हे २.८५ कोटी मतदार ठरविणार आहेत. ही निवडणूक ३ नोव्हेंरला विधानसभेच्या ९४ जागांसाठी होणार आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाविरोधातील लाटेचा फायदा घेत मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत उतरलेले राजदचे तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सत्तेत असलेल्या चार मंत्र्यांचे भवितव्यही पणाला लागलेले आहे.

  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आव्हान देणारे 31 वर्षीय तेजस्वी यादव हे वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते पुन्हा याच मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आहेत.
  • तेजस्वी यादव यांचे मोठे भाऊ तेजप्रताप यादव हे समस्टिपूरमधील हसनपूरमधून नशीब अजमावित आहेत.
  • दुसऱ्या टप्प्यात पाटना राजधानीतील पाटना साहिब, कुमहरार, बनकीपूर आणि दिघा या चार मतदारसंघाच्याही निवडणुका पार पडणार आहेत. या चारही मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे.
  • राज्य मंत्री नंदकिशोर यादव हे पाटना साहिबमधून सातव्यांदा निवडणूक लढविणार आहेत. पुन्हा आमदारकीसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
  • आमदार नितीन नबीन यांना बनकीपूरमधून काँग्रेसचे उमेदवार लव्ह सिन्हा यांचे आव्हान आहे. लव्ह हे अभिनेता, राजकीय नेता शुत्रघ्न सिन्हा यांचे चिरंजीव आहेत. सिन्हा हे स्थानिक मतदारसंघामधून दोनदा खासदार झाले होते. मात्र, भाजप सोडल्यानंतर त्यांना अपयश मिळाले होते.
  • नालंदा जिल्ह्यातील सात मतदारसंघ हे मुख्यंत्री नितीश कुमार यांच्या मानल्या जातात. या मतदारसंघातही दुसऱ्या टप्प्यात निवडणुका पार पडत आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ४१ हजार ३६२ मतदान केंद्र आहेत. बिहार विधानसभा निवडणूक एकूण तीन टप्प्यात होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details