महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींविरोधात निवडणूक लढणाऱ्या तेजबहादूर यांची उमेदवारी रद्द; 'हे' आहे कारण - nomination

तेजबहादूर यादव पंतप्रधान मोदींच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढणार होते. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या क्षणी समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तर, पूर्वीच घोषित केलेल्या शालिनी यादव यांचा उमेदवारी अर्ज पक्षाने परत घेतला.

तेजबहादूर यांची उमेदवारी रद्द

By

Published : May 1, 2019, 7:43 PM IST

वाराणसी - पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि बडतर्फ बीएसएफ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. यादव वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढत होते.

'माझी उमेदवारी चुकीच्या पद्धतीने बाद ठरविण्यात आली. मला काल संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत पुरावे जमा करण्यास सांगितले होते. आम्ही पुरावे सादर केले तरीही माझी उमेदवारी रद्द करण्यात आली. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ', अशी प्रतिक्रिया तेजबहादूर यादव यांनी दिली. आम्हाला मागण्यात आलेले पुरावे आम्ही सादर केले. तरीही यादव यांचे नामांकन रद्द करण्यात आले. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे यादव यांचे वकील राजेश गुप्ता यांनी सांगितले.

राज्य आणि केंद्र सरकारच्या नोकरीतून निष्काषित करण्यात आलेल्या व्यक्तीकडून निवडणूक आयोग एक प्रमाणपत्र मागत असते. सदर व्यक्तीला अप्रमाणिक वर्तणूक किंवा भ्रष्टाचारामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात आले नाही, अशा आशयाचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ११ वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर झाले नाही त्यामुळे उमेदवारी रद्द करण्यात आली, अशी माहिती वाराणसी जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी दिली.

शेवटच्या क्षणी दिली उमेदवारी -

तेजबहादूर यादव पंतप्रधान मोदींच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढणार होते. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या क्षणी समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तर, पूर्वीच घोषित केलेल्या शालिनी यादव यांचा उमेदवारी अर्ज पक्षाने परत घेतला.

तेजबहादूर यादव यांनी बीएसएफ जवानांना मिळणाऱ्या जेवणावर प्रश्नचिन्ह उचलले होते. त्यांनी याबद्दल अनेक अधिकाऱ्याला पत्र लिहून त्याबद्दल सूचनाही दिल्या होत्या. मात्र, त्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे आपण व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर केला, असे तेजबहादूर यादव यांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details