महेंद्रगड (हरियाणा) -सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेज बहादुर यांनी भिवानी-महेंद्रगड येथील काँग्रेसच्या उमेदवार श्रुती चौधरीला बाहेरुन समर्थन देणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी नारनौलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
बडतर्फ जवान तेज बहादुर यांचा काँग्रेसच्या उमेदवार श्रुती चौधरीला पाठींबा - support
भाजपचा पराभव करणे हाच माझा उद्देश आहे. यासाठी मी काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले आहे. मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही, असे तेज बहादुर यांनी सांगितले.
बडतर्फ जवान तेज बहादुर
भाजपचा पराभव करणे हाच माझा उद्देश आहे. यासाठी मी काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले आहे. मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही, असे तेज बहादुर यांनी सांगितले.
तेजबहादुर यादव यांनी २०१७ मध्ये बीएसएफ जवानांच्या जेवणात त्रुटी असलेला एक व्हिडिओ समोर आणला होता. त्यावेळी यादव चर्चेत आले. त्यानंतर त्यांना चक्क पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता.