महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाचा क्षयरोगावरही गंभीर परिणाम, मृत्यूदर तेरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता - कोरोनाचा क्षयरोगावरही गंभीर परिणाम

कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबली जाणारी धोरणे, विशेषत: लॉकडाऊन, आरोग्य कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या आणि उपकरणे याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याचा क्षयरोग प्रतिबंध आणि या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये क्षयरोगामुळे जगभरातील 1 लाख 90 अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा क्षयरोगावरही गंभीर परिणाम
कोरोनाचा क्षयरोगावरही गंभीर परिणाम

By

Published : May 7, 2020, 10:45 AM IST

हैदराबाद - जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच कोरोना संसर्गाचा जगभरातील क्षयरोग मृत्यूदरावर होणारा परिणाम याबद्दल एक अहवाल सादर केला आहे. यात प्रामुख्याने जागतिक क्षयरोगाच्या तपासणी आणि उपचारांसंदर्भात होणाऱ्या परिणामाबाबत सांगितले गेले आहे.

संशोधनात असे म्हटले आहे, की कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबली जाणारी धोरणे, विशेषत: लॉकडाऊन, आरोग्य कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या आणि उपकरणे याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याचा क्षयरोग प्रतिबंध आणि या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर परिणाम होणार आहे.

दरवर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये क्षयरोगामुळे जगभरातील 1 लाख 90 अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच क्षयरोग मृत्यूदर 13 टक्क्यांनी वाढण्यची शक्यता आहे. भारतात लॉकडाऊनपूर्वी म्हणजे 22 मार्चपर्यंत आठवड्याला 11 हजार 367 टीबी रुग्णांचे निदान होत होते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून हा आकडा 45 हजार पार गेला आाहे. त्यामुळे ही देशासाठी चिंताजनक बाब आहे

ABOUT THE AUTHOR

...view details