महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना महामारीत क्षयरोगींच्या मृत्यूचं प्रमाण वाढेल, जागतिक आरोग्य संघटना - कोरोना आणि क्षयरोग

कोरोना महामारीचा प्रभाव असतानाही राष्ट्रीय स्तरावरील टीबी निदान आणि केअर प्रोग्रॉम अत्यावश्यक समजून त्याची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य द्यावे. जर योग्य रितीने अंमलबजावणी केली गेली नाही तर जगभरातील क्षयरोग कार्यक्रम ५ वर्षांनी पिछाडीवर जाईल.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 6, 2020, 8:31 PM IST

कोरोना महामारीला आवर घालण्याच्या प्रयत्नात संपूर्ण जग व्यग्र आहे. मात्र, या काळात क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम मागे पडत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. क्षयरोगींची संख्या येत्या काळात वाढणार असून रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाणही वाढण्याची शक्यता डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. 'कोरोनामुळे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमावरील संभाव्य परिणाम' असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने ४ मेला प्रकाशित केला आहे.

जगभरातील आरोग्य यंत्रणा कोरोना साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी झटत आहे. त्यामुळे क्षयरोग विरोधी कार्यक्रमाला खीळ बसली आहे. लॉकडाऊन आधीच्या आकडेवारीशी तुलना करता जगभरात मागील ३ महिन्यांपासून २५ टक्के टीबीचे रुग्ण कमी आढळून येत आहेत. त्यामुळे जगभरात १३ टक्क्यांनी जास्त टीबी रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. जगभरात २०२० सालात सुमारे १६ लाख रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता अहवाला वर्तविण्यात आली आहे.

भारतातील क्षयरोगाची स्थिती कशी असेल?

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर टीबी रुग्णांची माहिती जमा करण्यासाठी असलेल्या 'निक्शय' पोर्टलवर माहिती भरली जात नाही. निक्शय ही भारतातील टीबी रुग्णांची रिअलटाईम माहिती जमा करण्यासाठी विकसित करण्यात आलेले पोर्टल आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक यामुळे भारतातील टीबीच्या चाचण्या कमी होत आहेत. जर टीबीच्या चाचण्या थांबल्या आणि रुग्णांची काळजी घेतली गेली नाही तर देशात मृत्यू वाढतील, असे अहवालात म्हटले आहे.

कोरोना महामारीचा प्रभाव असतानाही राष्ट्रीय स्तरावरील टीबी निदान आणि केअर प्रोग्रॉम अत्यावश्यक समजून त्याची अंमलबजावणी करण्यास प्राधान्य द्यावे. जर योग्य रितीने अंमलबजावणी केली गेली नाही तर जगभरातील क्षयरोग कार्यक्रम ५ वर्षांनी पिछाडीवर जाईल. २०१५ साली जेवढे मृत्यू झाले होते तेवढे २०२० साली होतील. जगातील आकडेवारी पाहता भारतात टीबीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना लोकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होतील, असे अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details