मुंबई- कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी टाटा ट्रस्टने 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा, तपासणी किट, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही मदत खर्च करण्यात येणार आहे.
कोरोना विरोधातील लढ्याला टाटा ट्रस्टची 500 कोटींची मदत
मदत जाहीर केल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा म्हणाले, कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी तत्काळ संसाधने उभी करण्याची गरज आहे.
मदत जाहीर केल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा म्हणाले, कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी तत्काळ संसाधने उभी करण्याची गरज आहे. जगातील आणि भारतातील परिस्थिती गंभीर असून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. टाटा उद्योग समुहातील कंपन्यांनी याआधाही देशाला गरज असताना मदत केली आहे. आधीच्या कोणत्याही संकटापेक्षा यावेळी मदतीची जास्त गरज आहे.
कोरोना विषाणूविरोधातील लढाईसाठी खासगी क्षेत्रातील अनेक कंपण्या समोर येत आहेत. रिलायन्स समुहाने रुग्णालया कोरोना रुग्णांना देण्याची तयारी दर्शवली आहे. तर वेदांता, महिंद्रा उद्योग समुहानेही मदत जाहीर केली आहे.