जयपूर - सीबीएसई बोर्डाच्या १० इयत्तेचा आज निकाल लागला आहे. यामध्ये देशात पहिला क्रमांकावर मुलीनेच बाजी मारली आहे. राजस्थानच्या तारू जैन हीने ५०० पैकी ४९९ गुण मिळवित देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
CBSE दहावीच्या परीक्षेत राजस्थानची तारू जैन देशात प्रथम; ५०० पैकी मिळविले ४९९ गुण - CBSE SSC result
दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तारू जैनला दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात शिक्षण घ्यायचे आहे.
![CBSE दहावीच्या परीक्षेत राजस्थानची तारू जैन देशात प्रथम; ५०० पैकी मिळविले ४९९ गुण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3205892-971-3205892-1557142303627.jpg)
तारू जैन
सीबीईएसईच्या यशावर प्रतिक्रिया देताना तारूने म्हटले, की मला खरोखर छान वाटत आहे. मी रोज चार ते पाच तास अभ्यास करत होते. मला दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात शिक्षण घ्यायचे आहे. मला पालक, शिक्षक आणि प्राचार्यांकडून सहकार्य मिळाल्याचेही तिने सांगितले.