महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तरबेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणाला नवे वळण; तरबेजचा मृत्यू मारहाणीमुळेच - Tarbej Ansari Mob lynching case

तरबेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आपला आधीचा निर्णय बदलत, कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले आरोपपत्र हे आधीच्या शवविच्छेदन अहवालावर आधारित होते. मात्र, दुसऱ्या शवविच्छेदन अहवालानंतर आता आरोपपत्र बदलण्यात येणार आहे. असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Tarbej Ansari

By

Published : Sep 18, 2019, 11:05 PM IST

रांची - झारखंडमधील तबरेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांनी आपला आधीचा निर्णय बदलत, कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड पोलीस मुख्यालयाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की पहिले आरोपपत्र हे आधीच्या शवविच्छेदन अहवालावर आधारित होते. मात्र, दुसऱ्या शवविच्छेदन अहवालानंतर आता आरोपपत्र बदलण्यात येणार आहे.

पहिल्या शवविच्छेदन अहवालात तबरेजच्या मृत्यूचे कारण हे हृदयाची गती थांबल्यामुळे असे होते. मात्र या अहवालात हृदयाची गती थांबण्याचे कारण स्पष्ट नव्हते. त्यामुळे पोलिसांनी वरिष्ठ चिकित्सा संस्था 'एमजीएम'ला पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्या अहवालानुसार तरबेजचा मृत्यू हा अत्यंत वाईट पद्धीतीने झालेल्या मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

एमजीएमच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरबेजच्या शरीरातील बरीच हाडे तुटली होती, तर कंपाउंड फ्रॅक्चर देखील झाले होते. मारहाणीमुळे तरबेजच्या हृदयाच्या कप्प्यात रक्त भरले गेले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

यासोबतच, तरबेजला झालेल्या मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ देखील पोलिसांनी तपासला. यात, हा व्हिडिओ खरा असल्याचे, आणि त्यासोबत कोणतीही छेडछाड न झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे आता या प्रकरणात भीमसेन मंडल, कमल महतो सुनामो प्रधान, प्रेम चंद्र महली, सुमंत महतो, मदन नायक, चामू नायक, महेश महली, कुशल महली, सत्यनरायन नायक, प्रकाश मंडल आणि पप्पू मंडल यांच्या विरोधात कलम ३०२ अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details