नवी दिल्ली - अंधश्रद्धेपोटी पत्नीचीच हत्या केल्याची एक धक्कादायक घटना मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौली येथे घडलीय. बसौडा गावातील एका तांत्रिकाने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह देवघरातच पूरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
अंधश्रद्धेचा कळस : इष्ट देवतेला खुश करण्यासाठी पत्नीचाच दिला बळी - तांत्रिकाने दिली पत्नीचा बळी
बसौडा गावातील एका तांत्रिकाने आपल्या पत्नीची हत्या करून मृतदेह पूजा घरात पूरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
![अंधश्रद्धेचा कळस : इष्ट देवतेला खुश करण्यासाठी पत्नीचाच दिला बळी सिंगरौली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8661004-530-8661004-1599118933671.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीचे डोके कापून पूजा घरात पूरले. जेव्हा तो पत्नीचे डोके कापत होता. तेव्हा आवाज ऐकून त्यांची दोन्ही मुले घरात पोहोचली. मात्र, सर्व प्रकार पाहून मुले घाबरली आणि तेथून पळाली. घाबरून पळत असताना एक मुलगा दरवाज्याला धडकला आणि बेशुद्ध झाला. तर दुसराही घटनास्थळापासून थोडे दूर पळत गेल्यानंतर बेशुद्ध होऊन पडला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृतदेह उकरून काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपी अंधश्रध्देच्या आहारी गेला होता. तो रात्र-दिवस पूजा-पाठ करायचा. यापूर्वी त्याने बकरीचाही बळी दिली होती. मात्र, यावेळस त्याने इष्ट देवतेला खुश करण्यासाठी आपल्या पत्नीचाच बळी दिला.