महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरातमध्ये महामार्गावर टँकरमधून अ‌ॅसिड गळती...रस्त्यावर पसरला धूर - रतलाम वायू गळती

नागदा आणि अहमदाबाद दरम्यान महामार्गावर हा अ‌ॅसिड गळतीचा अपघात झाला. टँकरमधून क्लोरोस्ल्फ्युरीक अ‌ॅसिडची वाहतूक करण्यात येत होती. या गळतीमुळे महामार्गावर सर्वत्र धूर पसरला आहे.

gas leak
अ‌ॅसिड गळती

By

Published : Aug 13, 2020, 5:37 PM IST

गांधीनगर - गुजरातमध्ये केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अ‌ॅसिड गळती झाली आहे. गुजरात- मध्यप्रदेश महामार्गावरील रतलाम बायपास जवळ ही घटना घडली. मध्यप्रदेशातून गुजरातमध्ये एका डाय कंपनीत अ‌ॅसिड घेवून जात असताना अचानक टँकरमधून अ‌ॅसिडची गळती होऊ लागली.

गुजरातमध्ये महामार्गावर टँकरमधून अ‌ॅसिड गळती

नागदा आणि अहमदाबाद दरम्यान महामार्गावर हा अ‌ॅसिड गळतीचा अपघात झाला. टँकरमधून क्लोरोस्ल्फ्यूरीक अ‌ॅसिडची वाहतूक करण्यात येत होती. या गळतीमुळे महामार्गावर सर्वत्र धूर पसरला आहे. कंपनीचे अधिकारीही तत्काळ घटनास्थळी पोहचले. या सोबत पोलीस आणि आग्निशामक दलाचे पथकही घटनास्थळी आले. अ‌ॅसिड गळती रोखण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून दुसऱ्या टँकरमध्ये अ‌ॅसिड भरण्यात येणार आहे. या कामात अर्धा ते पाऊण तास लागणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अ‌ॅसिड गळती
अ‌ॅसिड गळती

गॅस गळतीमुळे जीवतहानी आणि संपत्तीचे नुकसान झाल्याचे समोर आले नाही. गॅस गळती लक्षात येताच वाहन चालकाने टँकर रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीत अडथळा आला नाही.

अ‌ॅसिड गळती

ABOUT THE AUTHOR

...view details