महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 26, 2020, 12:58 PM IST

ETV Bharat / bharat

राजपथावरही 'ती'चा आवाज , कॅप्टन तानिया शेरगील यांनी केले प्रजासत्ताकदिन संचलनाचे नेतृत्व

प्रजासत्ताक दिन दिल्लीसह देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त दिल्लीतील राजपथवर पथसंचालन करण्यात आले.

कॅप्टन तानीया शेरगील
कॅप्टन तानीया शेरगील

नवी दिल्ली -प्रजासत्ताक दिन दिल्लीसह देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर पथसंचलन करण्यात आले. यंदा कॅप्टन तानिया शेरगील यांनी राजपथावर संचलनाचे नेतृत्व केले.

कॅप्टन तानीया शेरगील यांनी केले राजपथावरील संचलनाचे नेतृत्व
पुरुषांच्या सर्व पथकांचं नेतृत्त्व करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांची नोंद झाली आहे. जेव्हा तुम्ही लष्करी वर्दी घालता, तुम्ही स्त्री, पुरूष, हिंदू, मुस्लिम, पंजाबी किंवा मराठी नसून फक्त एक सैनिक असता, अशी प्रतिक्रिया तानिया यांनी दिली. गतवर्षी २६ जानेवारीला लेफ्टनंट भावना कस्तुरी (एएससी) यांनी राजपथावर संचलनाचे नेतृत्व केले होते. यापुर्वी कॅप्टन तानीया यांनी सैन्य दिन आयोजित संचलनाचे नेतृत्व केले होते. तानीया यांना प्रवास, संगीत आणि फोटोग्राफीची आवड आहे. सध्या त्या मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे 1-सिग्नल प्रशिक्षम केंद्रात कार्यरत आहेत. त्यांनी नागपूर येथील विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स एँड कम्युनिकेशन्समध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतले आहे. मार्च २०१७ मध्ये चेन्नईतील ऑफसर्स ट्रेनिंग अकॅडमीतून त्या सेनेत सामिल झाल्या होत्या.तानीया यांचा जन्म 1993 मध्ये झाला आहे. शेरगिल यांचे वडिलही सैन्यात कार्यरत होते. १०१ मीडियम रेजिमेंटमध्ये राहत त्यांनी देशाची सेवा केली. तर, तान्या शेरगिल यांचे आजोबा आर्म्ड रेजिमेंट आणि पणजोबा शीख रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.दिल्लीतील राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रजासत्ताक दिनाला ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख अतिथी ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो हे राजपथवर उपस्थित आहेत. तीन्ही दलांकडून राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details