चेन्नई - राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या मरकज धार्मिक कार्यक्रमाला तामिळनाडूतील 1 हजार 500 जणांनी हजेरी लावली होती. त्यापैकी 50 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 124 झाला आहे.
'मरकज'ला गेलेल्या तामिळनाडूतील 50 जणांना कोरोनाची बाधा - कोरोना संसर्ग
दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित मरकज कार्यक्रमाला गेलेले 1 हजार 130 नागरिक माघारी राज्यात आले आहेत. त्यापैकी 50 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित मरकज कार्यक्रमाला गेलेले 1 हजार 130 नागरिक माघारी राज्यात आले आहेत. तर इतर दिल्लीतच थांबले होते. तामिळनाडून माघारी आलेल्या 515 जणांना शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य सचिव बिला राजेश यांनी दिली.
निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले. यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.