चेन्नई :सध्या ऑनलाईन रमी, ड्रीम इलेव्हन असे अनेक ऑनलाईन गेम्स बरेच चर्चेत आहेत. या सर्व गेम्समध्ये खेळाडूंना खऱ्या पैशांचा वापर करता येतो. अशा प्रकारच्या सर्व ऑनलाईन गेम्सना बॅन करण्याचा विचार सध्या तामिळनाडू सरकार करत आहे. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.
"ऑनलाईन रमी या गेममुळे राज्यात बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे सरकार सध्या अशा गेम्सवर बंदी आणण्याचा विचार करत आहे" असे त्यांनी कोईंबतुरमध्ये पत्रकारांना सांगितले. इंटरनेट आणि अशा गेम्सचा झपाट्याने प्रसार होतो आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी यावरच आपला वेळ आणि पैसाही वाया घालवताना दिसून येत आहे, असे पलानीस्वामी म्हणाले.