चेन्नई -कोरोना विषाणूच्या भीतीने रूग्णांची तपासणी करण्यासाठी वापरलेल्या अनोख्या पद्धतीने तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील एक डॉक्टर अडचणीत सापडला आहे. हा डॉक्टर पाच मीटर अंतरावर रुग्णाला उभे करून तपसाणी करत असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाच मीटर अंतर ठेवून रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरची तडकाफडकी बदली - कंदमंगलम कोविड १९ अपडेट
9 जूनला कंदमंगलममधील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) एक तरूण तपासणीसाठी आला. घश्यात दुखत असल्याने तो तपासणीसाठी आला होता. कोरोनाला घाबरलेल्या डॉक्टरने पाच मीटर अंतरावरून टॉर्चलाईट लावून त्याची तपासणी केली.
9 जूनला कंदमंगलममधील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) एक तरूण तपासणीसाठी आला. घश्यात दुखत असल्याने तो तपासणीसाठी आला होता. घशात दुखणे हे कोरोनाचे एक लक्षण आहे. त्यामुळे घाबरलेल्या डॉक्टरने त्याला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे केले. डॉक्टरने पाच मीटर अंतरावरून टॉर्चलाईट लावून त्याची तपासणी केली.
हा संपूर्ण प्रकार दुसर्या रूग्णाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. या व्हिडिओमध्ये डॉक्टर पाच मीटरअंतरावरून रुग्णाची तपासणी करत आहे. प्रिस्क्रिप्शन सुद्धा एका महिला कर्मचाऱ्याकरवी या तरुणाला देण्यात आले. मात्र, त्याला रुग्णालयात येऊ दिले नाही. लवकरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विल्लुपुरम आरोग्य विभागाने या डॉक्टर विरोधात कारवाई केली असून त्याच्या बदलीचे आदेश दिले आहेत.