चेन्नई (तामिळनाडू) - पुळल मध्यवर्ती कारागृहामध्ये 42 वर्षीय कैद्याने फास लावून आत्महत्या केल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. जन्मठेपेची शिक्षा घेत असणारा कैदी तणावात होता. त्यांने नैराश्यात जावून आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
जन्मठेपेची शिक्षा घेत असलेल्या कैद्याची चेन्नईमध्ये नैराश्यातून आत्महत्या - sexual assault
जन्मठेपेची शिक्षा घेत असणारा कैदी तणावात होता. त्यांने नैराश्यात जावून आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

चेन्नईमध्ये जन्मठेपेची शिक्षा घेत असलेल्या कैद्याची नैराश्यातून आत्महत्या
आत्महत्या केलेल्या कैद्याचे पळानी असे नाव आहे. कारागृह अधीक्षकांच्या माहितीनुसार, हा कैदी तणावातून बाहेर पडण्यासाठी उपचार घेत होता. त्याने बाथरूममध्ये आत्महत्या केल्याचे इतर कैद्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी कारगृह प्रभारींना कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.