हैदराबाद - कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरीही पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी कोरोनासंबधित कर्तव्यावर असताना पत्रकाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाखांची मदत, तामिळनाडू सरकारचा निर्णय - कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू
तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी कोरोनासंबधित कर्तव्यावर असताना पत्रकाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबाला 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
कोरोनाच्या मोठ्या संकटातही पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. पत्रकार घराबाहेर पडून परिस्थितीचा आढावा घेत असून माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. अशातच पत्रकारांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे जर एखाद्या मान्यताप्राप्त पत्रकाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
दरम्यान राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 25 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून 180 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.