काबूल -ईदच्या निमित्ताने अफगाणिस्तान सरकारमधील अटक कैद्यांना मुक्त करणार असल्याचे तालिबानने जाहीर केले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. अमेरिका-तालिबान शांतता करारानुसार दोन्ही पक्षांनी कैद्यांची सुटका करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आता कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अफगाणिस्तान सरकारनेही दोहा करारानुसार 5 हजार कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच ईदनंतर चर्चा सुरू करण्यात यावी, असे तालिबानच्या कतारमधील प्रवक्त्याने सांगितले. अमेरिका-तालिबान शांतता करारानुसार अफगाणिस्तान सरकार 5 हजार कैद्यांची सुटका करेल, तर तालिबान 1 हजार कैद्यांची सुटका करेल, असे मान्य करण्यात आले आहे.