नवी दिल्ली - पाच मिनिट उभे राहून मोदींना सन्मानित करावे, अशी मोहीम काही जणांनी सुरू केल्याची माहिती मला मिळाली आहे. मात्र, असे करण्यापेक्षा कोरोना संकट संपत नाही तोपर्यंत एका गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केले आहे. ट्विटरद्वारे मोदींनी ही माहिती दिली आहे.
माझ्यावर प्रेम असेल तर एवढंच करा..! पंतप्रधान मोदींच जनतेला आवाहन - संचारबंदी
जर तुम्ही माझ्यावर खरंच एवढ प्रेम करत असाल तर आणि मला सन्मानित करू इच्छित असाल तर एका गरीब परिवाराची कोरोनाचे संकट संपेपर्यंत जबाबदारी घ्या.
पाच मिनिटे उभे राहून मोदींना सन्मानित करावे ही मोहिम मला वादात ओढण्याची कोणतीतरी कुरापत वाटतेय. मात्र, यामागे कोणाचा चांगला हेतूही असून शकतो. जर तुम्ही माझ्यावर खरंच एवढ प्रेम करत असाल तर आणि मला सन्मानित करू इच्छित असाल तर एका गरीब परिवाराची कोरोनाचे संकट संपेपर्यंत जबाबदारी घ्या. यापेक्षा माझा दुसरा मोठा सन्मान नाही, अशी माहिती मोदींनी ट्विटरद्वारे दिली आहे.
सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्याचे सर्वात जास्त हाल होत आहेत. या कामगारांचा रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबांची जबाबदारी घ्यावी असे आवाहन मोदींनी नागरिकांना केले आहे.