आपण श्रद्धाळूपणे हात धूत आहोत. आपण व्हॅम्पायर स्नीझ अर्थात शिंकताना एखाद्या व्हॅम्पायरप्रमाणे कोपऱ्यापासून दुमडलेला हात समोर ठेवण्याच्या नियमाचे पालन करीत आहोत. आपण आपल्या चेहऱ्यांना स्पर्श करत नाही. आपण मास्क घालीत आहोत आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करीत आहोत. एक किंवा दोन नाही, तर कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण शेकडो उपाययोजना करीत आहोत. मात्र, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे स्वतः च्या रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करणे. एकीकडे ही महामारी अनेकांचे प्राण आणि उपजीविकांवर हल्ला करीत आहे, आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वेळोवेळी बदल घडत असतो. वयानुसार, आपल्या शरीरातील रोगप्रतिकार कार्ये कमी होऊ लागतात.
जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीचा प्रश्न येतो, इतर सर्व गोष्टी मागे पडतात. संसर्गांच्या बाबतीत हे विशेष सत्य आहे. जर रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य रीतीने काम करीत असेल, तर कोणतेही अँटीजेन शरीरावर हल्ला करु शकत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. वयोवृद्ध लोकसंख्येत या रोगाची तीव्रता जास्त आहे. यामुळे, सर्वांचे लक्ष रोगप्रतिकारक शक्तीकडे लागले आहे. खरंतर, आईच्या उदरात असल्यापासून ही शक्ती योग्य रीतीने विकसित करीत असते.
इम्युनोग्लोब्युलिन्सद्वारे आईच्या गर्भाच्या वेष्टनातून (प्लॅसेंटा) अर्भकाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. आईच्या आरोग्याच्या स्थितीवर, तिला पुर्वी झालेले रोग आणि मिळालेल्या लसीकरणावर ही गोष्ट अवलंबून आहे. काही इम्युनोग्लोब्युलिन्स हे स्तनपानाच्यावेळी बाळापर्यंत पोहोचतात. याद्वारे मिळालेली रोगप्रतिकारक शक्ती काही महिने टिकून राहते. आतड्यातील संसर्ग, लसी आणि जीवाणू नैसर्गिक रोगप्रतिकारक यंत्रणा निर्माण करतात. मात्र, वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते, याची सुरुवात पौगंडावस्थेपासून होते. साठीमध्ये हा ऱ्हास जलद आणि वेगवान होतो. मात्र, चांगली गोष्ट अशी की, कोणतेही वय असो, काही लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि काहींची कमकुवत असते.
काही सोप्या गोष्टींचे पालन करुन, कोणीही आपली रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा वाढवू शकते. कोविड-19 हा आजार 1918 साली आलेल्या स्पॅनिश फ्लूनंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची महामारी मानली जाते. नव्या कोरोना विषाणूवर कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नसल्याने या विषाणूचे अस्तित्व अजून काही काळ टिकून राहणार आहे. म्हणून, आपली रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे महत्त्वाचे आहे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे हा एका दिवसाचा खेळ नाही. यासाठी सातत्य आवश्यक आहे. जर आपण सातत्याने प्रयत्न केले, तरच आपल्यासमोरील दीर्घ लढ्यात विजय शक्य आहे, हे लक्षात ठेवायलाच हवे.
हृद्योधिस्ष्ठ ग्रंथि (थायमस ग्लँड) रोगप्रतिकारक यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात. छातीच्या हाडामागे याचे स्थान असते. याच ठिकाणी टी-लिम्फोसाइट्सना संसर्गाशी लढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लहान वयात सक्रिय असलेली थायमस ग्रंथी वयानुसार निष्क्रीय होत जाते. पौगंडावस्थेपासून सुरुवात होऊन, ही ग्रंथी दर वर्षाला 3 टक्क्यांनी कमी होते आणि म्हातारपणी पुर्णपणे नाहीशी होते. म्हणून म्हातारपणी नव्या संसर्गाचा सामना करणे अवघड जाते, त्याचे हे एक कारण आहे. लहान मुलांमध्ये कोविड-19 च्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे, त्याचे एक कारण म्हणजे थायमस ग्रंथी हे असू शकते.
रोगप्रतिकारक यंत्रणा ही शरीरातील दुसऱ्या क्रमांकाची जटील यंत्रणा आहे. शेकडो प्रकारच्या पेशी, जैविक संरचना आणि 8,000 जनुकांपासून ही यंत्रणा तयार झालेली असते. यामध्ये दोन स्तरावर संरक्षण तयार केले जाते. आपण ज्याच्यासह जन्माला आलो ती नैसर्गिक यंत्रणा. या प्रणालीद्वारे कोणत्याही परकीय घटकांचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांना मारुन टाकण्यासाठी लगेचच न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफेजेस तयार केले जाते. दुसरी आहे अनुकूल रोगप्रतिकारक प्रणाली. जेव्हा आपल्या शरीराचा सूक्ष्मजंतू किंवा सूक्ष्मजंतूंनी सोडलेली रसायनांशी संबंध येतो, तेव्हा ही यंत्रणा विकसित होते. यामध्ये टी सेल्स, बी सेल्स आणि अँटीबॉडीजचा समावेश असतो. हल्ला करण्यात त्यांची गती कमी असते. बी सेल्सनादेखील स्मरणशक्ती असते.
पूर्वी कोणत्या सूक्ष्मजंतूंनी शरीरास संसर्ग झाला होता, हे ते लक्षात ठेवतात आणि जर दुसऱ्यांदा हल्ला झाला त्या सूक्ष्मजंतूंना मारण्यासाठी अँटीबॉडीजची नियुक्ती केली जाते. इन्फ्ल्युएन्झासारखे विषाणू बी सेल्सना चुकवण्यासाठी त्यांच्या जनुकीय संरचनेत बदल करतात. नवा कोरोना विषाणूदेखील अशाच पद्धतीने काम करतो, रोगप्रतिकारक यंत्रणेवर भार टाकतो.
रोगप्रतिकारक यंत्रणेची स्थिती ढासळत आहे. यापासून काही लोकांना कसलाही धोका जाणवत नाही. खरंतर, पौगंडावस्थेपासून आपल्या रोगप्रतिकारकतेत हळुहळु घसरण होत जाते. आपल्या जीवनशैलीतील विविध पैलूदेखील या घसरणीस कारणीभूत ठरतात. बैठी जीवनशैली असणारे, सिगरेट किंवा मद्यपान करणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक यंत्रणा नेहमीपेक्षा कमी असते. सहसा, जेव्हा परकीय घटक शरीरात प्रवेश खरतात, न्युट्रोफिल्स (डब्लूबीसीचा प्रकार) पहिल्यांदा समोर येतात. संसर्गाशी सामना करण्यासाठी ते सायटोकिन्ससारखे एन्झाईम्स सोडतात. वयानुसार न्युट्रोफिल्सदेखील संभ्रमात पडते.