महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वादळामूळे आग्र्यातील ताजमहलाच्या मुख्य कबरीचे रेलिंग तुटले - lockdown in agra

आग्रा इथे झालेल्या वादळाने विद्युत खांब, झाडं, घरं नष्ट झाल्याची माहिती आहे. या वादळात 3 जणांचा मृत्यू झाला असून ताजमहालाचेही या वादळामुळे मोठं नुकसान झाले आहे.

ताजमहल
ताजमहल

By

Published : May 30, 2020, 11:40 AM IST

आग्रा -शहराला रात्री 120 किमी प्रतितास वेगाने आलेल्या वादळाचा तडाखा बसला. ताजमहालाचेही या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळात ताजमहालच्या मुख्य कबरीची संगमरवरी रेलिंग तुटली आहे.

वादळामूळे शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी एएसआय अधिकारी आणि कर्मचारी ताजमहाल आणि इतर ऐतिहासिक इमारतींचे नुकसानाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले.

या वादळात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आग्रा येथे झालेल्या प्रचंड वादळाने ताजमहालच नव्हे तर शहरातील विविध भागांना उद्ध्वस्त केले. या वादळात 10 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान वादळानंतर गारपीट व मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details