हैदराबाद - तहसीलदार विजया रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपी सुरेश मृदिथा याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. विजया यांच्या हत्येनंतर सुरेशने स्वतःलाही पेटवून घेतले होते. त्याच्यावर ओस्मानिया रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (गुरुवार) दुपारी ३.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात अब्दुल्लापुरमेट तालुक्याच्या तहसीलदार विजया रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयातच जिवंत जाळल्याची घटना सोमवारी (४ नोव्हेंबर) घडली होती. आरोपी सुरेशने तहसीलदार कार्यालयात घुसून विजया यांच्यावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले, त्यानंतर स्वतःलाही त्याने पेटवून घेतले होते.
यावेळी विजया यांना वाचवण्याच्या प्रयत्नात होरपळला गेलेला त्यांचा चालक गुरुनाथम, याचाही मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
'त्या' तहसीलदारांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीचा रुग्णालयात मृत्यू - तेलंगणा तहसिलदार हत्या
तहसीलदार विजया रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपी सुरेश मृदिथा याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. विजया यांच्या हत्येनंतर सुरेशने स्वतःलाही पेटवून घेतले होते. त्याच्यावर ओस्मानिया रुग्णालयात उपचार सुरू होते.

Tahsildar Vijayaraddy murder case accused Suresh Mriditha