महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दहा वर्षानंतरही वीर जवानाच्या कुटुंबियांची उपेक्षाच - ताड़मेटला में शहीद रायगढ़ का जवान

दहा वर्षांपूर्वी 6 अप्रैल रोजी नक्षली हल्ल्यात रायगढ जिल्ह्यातील जवान राजाराम एक्का यांना वीरमरण आले होते. ताडमेटला येथे झालेल्या हल्ल्यात वीरगती पत्करलेल्या सीआरपीएफ पथकातील राजाराम हे एक जवान होते. वीरगती आल्यानंतर राज्य और केंद्र सरकारने एकदा आर्थिक सहायता केली त्यानंतर 10 वर्षांत कोणी ढुंकूनही पाहिले नाही.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 6, 2020, 1:50 PM IST

रायपूर - देशाच्या रक्षणासाठी आपले घरदार, परिवार सोडून अनेक सैनिक नक्षलवाद्यांशी दोन हात करतात. या दरम्यान काहींना वीरगती प्राप्त होते. 6 एप्रिल रोजी झालेल्या नक्षली हल्ल्यात रायगड जिल्ह्याच्या सोनाजोरी या छोट्याशा गावातील राजाराम एक्का यांना वीरमरण आले होते. या घटनेला दहा वर्षे उलटून गेली. त्यावेळी शासनाकडून विविध मदत जाहीर करण्यात आली होती. पण, आतापर्यंत शासनाची कोणतीच मदत त्यांच्या कुटुंबियांना मिळाली नाही. देशासाठी आपले जीव देणाऱ्या वीर जवानाच्या कुटुंबियांची उपेक्षाच होत आहे.

दहा वर्षानंतरही वीर जवानाच्या कुटुंबियांची उपेक्षाच

छत्तीसगढमध्ये सत्तांतर झाले, दहा वर्षांत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वीर राजाराम परिवाराला शासन आणि प्रशासनाने अनेक आश्वासने दिली होती. पण, त्यापैकी काहीच पुर्ण केले नाहीत. त्यांना कुटुंबियांना मदतीची आजही अपेक्षा आहे. त्याचबरोबर वीर जवानांच्या गावात त्यांच्या नावाने शाळा आणि गावात त्यांच्या पुतळ्याची उभारणी करण्याचीही घोषणा केली होती. ती घोषणा आजपर्यंत घोषणाच राहील्या आहेत.

आश्वासनाच्या खैरातीनंतर शासनाला विसर

वीर जवानाच्या पत्नीने सांगितले, सरकारने आर्थिक सहायता केली. पण, त्यानंतर अनेक वर्षे त्यांना पेंशन मिळाली नाही. हक्काच्या पेंशनसाठीही खूप लढा द्यावा लागला. वीर जवानच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही शासनाने घेतली होती. पण, एक वर्षाचा खर्च देत नंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी त्यांची मुलगी फक्त पाच वर्षांचीच होती. राजाराम यांच्या पत्नीने अनुकंपामध्ये नोकरी मिळावी, यासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजविली. पण, निराशावियतिरीक्त त्यांना काहीच मिळाले नाही. फक्त बस 15 अगस्त आणि 26 जनवरीच्या दिवशी त्यांना बोलविण्यात येते आणि शाल-श्रीफळ देऊन परत पाठविले जाते.

ती भेट शेवटची...

जवान राजारामच्या पत्नी नीर कुमारी म्हणाल्या, 1975 मध्ये त्यांच्या पतीचा जन्म झाला होता. 1995 साली 20 वर्षाचे असताना त्यांनी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. 2000 साली त्यांचे लग्न झाले आणि 2005 साली त्यांची मुलगी रेश्मा एक्का हीचा जन्म झाला. पुढे त्या म्हणाल्या, मार्च, 2010 मध्ये सणासाठी ते घरी आले होते. त्यावेळी अचानक त्यांना सुट्टीवरुन परत येण्याचा संदेश आला. तेव्हा 15 मार्च, 2010 रोजी राजाराम घरातून दंतेवाडा येथे निघाले. ती शेवटची भेट होती.

दोन दिवसांनी मिळाले पार्थिव

घरुन गेल्यानंतर वीरगती येण्यापूर्वी एकवेळा फोनवरुन त्यांच्याशी संभाषण झाले होते. 6 एप्रिल रोजी त्यांच्या वीरमरणाची बातमी कळाली. नीर कुमारी यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे शव छिन्नविछिन्न स्थितीत गावी आणण्यात आले.

आईचे अश्रू अनावर

वीर जवान राजाराम यांच्या आई सांगतात की, राजाराम त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. राजाराम यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर सर्व जबाबदारी राजाराम यांच्यावरच होती. राजाराम यांचे शिक्षण अत्यंत हालाकीच्या स्थितीत झाले. जेव्हा वही, पुस्तक खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे त्यावेळी त्यांनी हातभट्टीची दारु विकून ते खरेदी केले. रामाराज यांनी बालपणापासूनच देशसेवा करायची इच्छा होती. त्यांनी कौटुंबिक परिस्थिती पाहता सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली. हे सांगत असताना त्यांच्या आईचे अश्रु अनावर झाले.

हेही वाचा -Coronavirus : तिहार तुरुंगात मास्कची निर्मिती, कैद्यांनी बनवले 75 हजार मास्क

ABOUT THE AUTHOR

...view details