नवी दिल्ली: दिल्लीतील एका न्यायालयाने तबलिगी जमातला हजेरी लावलेल्या २०० इंडोनेशियन नागरिकांना जामीन मंजूर केला. व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली होती.
प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या जामीनावर या सर्वांची सुटका करण्यात आली. मुख्य मॅट्रोपॉलिटिअन दंडाधिकारी गुरमोहिना कौर यांनी हा निर्णय घेतला.
आपल्या जामिनाची रक्कम कमी करावी यासाठी हे सर्व गुरुवारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अशिमा मंडला, मंदाकिनी सिंग आणि फाहीम खान या त्यांच्या वकिलांनी दिली. जर एखादा गुन्हा हा महिलेविरोधात, किंवा १४ वर्षाखालील लहान मुलाविरोधात केला गेला नसेल; आणि त्यामुळे समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होणार नसेल, तर अशा वेळी आपली शिक्षा कमी करुन घेण्यासाठी आरोपीला याचिका दाखल करता येते.
या परदेशी नागरिकांनी प्रवासी व्हिसावर तबलिगी जमात सारख्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वेगळ्या प्रकारचा व्हिसा घेणे बंधनकारक असते. त्यामुळे, या सर्वांना अटक करण्यात आली होती.