तिरुवअनंतपूरम - लॉकडाऊनमुळे केरळ येथे अडकलेले स्वित्झर्लंडचे जवळपास १६४ नागरिकांची कोचिन आतंरराष्ट्रीय विमानतळावरून रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी ११ वाजून १० मिनिटांनी कोचिन विमानतळावरुन हे विमान झुरीचला रवाना झाले.
AIRLIFT : स्वित्झर्लंडच्या नागरिकांची कोची ते झुरीचपर्यंत विमानाने रवानगी - kochi to Zurich Airlift
या विमानातून जवळपास २२६ स्विस नागरिकांची रवानगी करण्यात आली आहे.
![AIRLIFT : स्वित्झर्लंडच्या नागरिकांची कोची ते झुरीचपर्यंत विमानाने रवानगी swiss-citizens-airlifted-from-kochi-to-zurich](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6946652-thumbnail-3x2-ani.jpg)
AIRLIFT : स्वित्झर्लंडच्या नागरिकांची कोची ते झुरीचपर्यंत विमानाने रवानगी
शनिवारी ६२ स्विस नागरिकांना घेऊन कोलकातावरुन देखील एक विमान कोचीला पोहोचले होते. त्यांची देखील झुरीचला रवानगी झाली आहे. या विमानातून जवळपास २२६ स्विस नागरिकांची रवानगी करण्यात आली आहे.
कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली. तसेच त्यांच्या वस्तूंचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात आले.