नवी दिल्ली - स्विस बँकेने अघोषित खातेधारकांविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी ५० भारतीय खातेधारकांना बँकेच्या नवीन सुचनेसबंधी नोटीस पाठवण्याची प्रकिया सुरू केली आहे. स्वित्झर्लंड सरकारने देशाच्या प्रतिमेत सुधार करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
स्वित्झर्लंडने स्विस बँकेत पैसे ठेवणाऱया खातेधारकांविषयी माहिती देण्यासाठी भारत सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. स्वित्झर्लंडने असा करार अन्य देशांसोबतही केला आहे. यामुळे, स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी मार्चपासून आतापर्यंत जवळपास ५० भारतीय खातेधारकांना नोटीसा पाठवल्या आहेत. याबरोबरच भारत सरकारला सूचना देण्यापूर्वी खातेधारकांना अपील करण्याची एक संधी देण्यात आली आहे.