भोपाळ- राष्ट्रीय सिनीयर जलतरण स्पर्धेत अपेक्षा फर्नांडिस हिने अव्वल क्रमांक पटकावला आहे. महिला गटातील २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात तिने ही कामगिरी केली. मात्र, अवघ्या एका सेकंदाने आपला याआधीचा विक्रम तोडण्यापासून ती दूर राहिली.
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत अपेक्षा फर्नांडिस विजेती - national swimming championship
भोपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सिनीयर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या अपेक्षा फर्नांडिसने महिला गटातील २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात विजेतेपद मिळवले आहे.
अपेक्षा फर्नांडिस
या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबाबत तिला अधिक विचारले असता तिने समाधान व्यक्त करत या पुढील स्पर्धेत हा विक्रम तोडायचा प्रयत्न करेन असे सांगितले. येणाऱ्या स्पर्धांबद्दल बोलताना अपेक्षाने सांगितले की, बंगळूर येथे सराव सत्र सुरू असून तिथे माझी आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी चालू आहे. जलतरण या खेळात मुलींच्या सहभागावर तिने सकारात्मक मत व्यक्त करत आता मुलींनाही प्रोत्साहन दिले जात असून त्यामुळे त्या पूढे येत असल्याचे सांगितले.