कोची (तिरुवनंतपुरम)– केरळमधील सोने तस्करीप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्ना सुरेशच्या जामिनाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विरोध केला आहे. तिचे दुबईमधील दुतावासामध्ये जवळचे संबध होते, असे एनआयएने जामिनाला विरोध करताना म्हटले आहे.
स्वप्ना सुरेश हिने जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सोने तस्करीचे संवेदनशील गुन्हे प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून केला जात आहे. या तपास संस्थेने स्वप्ना सुरेशच्या जामिनाला विरोध केला आहे. तिचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे कार्याल आणि दुबईच्या दुतावासात जवळचे संबंध आहेत. त्या संबंधाचा आरोपीने खूप गैरफायदा घेतल्याचा एनआयएने दावा केला आहे.
दुबई दुतावासातून नोकरी सोडल्यानंतर तिला दर महिन्याला 1 हजार डॉलरचे वेतन देण्यात येते. यावरून तिचे दुबईमधील दुतावासात जवळचे संबंध असल्याचे दिसून येते, असे तपास संस्थेने म्हटले आहे.