मुंबई : भाजपचे खासदार सुब्रमण्यण स्वामी यांनी ट्विट करत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. सुशांतचा मृतदेह ज्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आला, त्याच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुशांतचे पाय हे मोडल्याप्रमाणे वाकडे झाले होते, असे ट्विट स्वामींनी केले आहे.
सुशांतसिंहचे पाय तुटलेल्या अवस्थेत होते; सुब्रमण्यण स्वामींचा खळबळजनक दावा! - सुब्रमण्यम स्वामी सुशांत सिंह राजपूत
सुशांतचा मृतदेह ज्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आला, त्याच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुशांतचे पाय हे मोडल्याप्रमाणे वाकडे झाले होते असे ट्विट स्वामींनी केले आहे. यासोबतच त्यांनी या ट्विटमध्ये सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या पाच डॉक्टरांवरही शंका व्यक्त केली आहे..
यासोबतच त्यांनी या ट्विटमध्ये सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या पाच डॉक्टरांवरही शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या होती की हत्या याबाबत आता पुन्हा विविध तर्क व्यक्त केले जात आहेत.
१४ जूनला सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरी आढळून आला होता. त्याच्या मृतदेहाला कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. या शवविच्छेदन अहवालामध्ये सुशांतचा मृत्यू आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले होते.