कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुवेंदू यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप नेत्यांनी म्हटल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अधिकारी कुटुंबाचा राजकीय दबदबा -
सुवेंदू अधिकारी हे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांचे थोरले पुत्र आहेत. सुवेंदू अधिकारी यांचे वडिल आणि भाऊ दोघेही खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून तृणमूल काँग्रेसने पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी आपली पकड गमावली आहे. अधिकारी यांनी पक्ष सोडल्यास पूर्व मिदनापूरमध्ये पक्षाची स्थितीही खालावू शकते. भाजप याकडे एक संधी म्हणून पाहत आहे. सुवेंदू अधिकारीचा भाऊ दिव्येंदू अधिकारी पूर्व मिदनापूरमधील तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
तृणमूलचे भविष्य अंधकारमय -