चाईबासा (झारखंड) - झारखंडच्या चाईबासामध्ये मंगळवारी जादूटोणा केल्याच्या संशयावरून आठ जणांना ठार करण्यात आले. वृत्तानुसार, एक आदिवासी व्यक्ती अत्यंत गंभीर जखमी स्थितीत सदर रुग्णालयात दाखल झाली. गुमदी सुरीन असे या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या काकांनी आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या केली, असा थेट आरोप त्याने केला आहे.
"माझे आणि माझ्या काकांचे नाव एकच आहे - गुमदी सुरीन. मी गेल्या 10-15 दिवसांपासून काब्रागुटू येथे माझ्या सासरच्या घरात राहत आहे. माझे काका मला मारण्यासाठी येथे आले होते. मात्र, मी घटनास्थळावरून पळून गेलो आणि माझ्या बहिणीच्या पोहोचण्यात यशस्वी झालो. तिने मला दवाखान्यात नेले. माझ्या काकांनी त्यांच्या कुटुंबातील त्यांचा भाऊ-वहिनी, दोन पुतण्या, एक पुतणा आणि तीन नात-नातवांसह 8 जणांची हत्या केल्याचा मला संशय आहे', असे सुरीन म्हणाला. तसेच, काकाने आपल्यालाही गळा चिरून मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा -राजस्थान : लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपी अटकेत
काकांनी आपल्या पत्नीची हत्या केली असावी आणि आपल्या काकूवरती कथितरीत्या सामूहिक बलात्कार झाल्याबद्दलही शंका उपस्थित केली, असा आरोपही त्यांनी केला.